NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाव करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे, प्रत्यक्षात धर्मप्रचार? मालेगावमध्ये..

0

मालेगाव/एनजीएन नेटवर्क

करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या नावाखाली मालेगावमध्ये मुस्लिम धर्माचा प्रचार करण्याचा कथित प्रयत्न झाल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यास तीव्र आक्षेप घेतल्यानंतर कॅम्प पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हा दाखल असला तरी धर्मप्रचाराचा कोणताही प्रकार झाला नसल्याचा ठाम दावा उपस्थित शिक्षकांनी केला आहे.

येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात रविवारी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. सत्य मालिक लोकसेवा ग्रुप हे या मेळाव्याचे आयोजक होते. त्यासाठी पुणे येथील अनिस डिफेन्स करिअर अकॅडमी संस्थेचे संचालक अनिस कुटी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मेळाव्यास शहरातील दोन्ही धर्मातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी उपस्थित होते. या मेळाव्यात करिअर मार्गदर्शनाच्या नावाने मुस्लिम धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती तेथे उपस्थित काही तरुणांनी शहरातील काहींना भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. या प्रकारास त्यांनी तीव्र आक्षेप घेतला तसेच आयोजक व महाविद्यालयीन प्रशासनाकडे याचा जाब विचारला.

दरम्यान, या प्रकारची चर्चा शहरभर पसरल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक प्रदीप जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश काळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. आक्रमक विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, असा आग्रह धरला.यावेळी छावणी व कॅम्प पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान गुन्हा दाखल असला तरी धर्मप्रचाराचा कोणताही प्रकार झाला नसल्याचे उपस्थित शिक्षकांचे म्हणणे आहे.

पालकमंत्री थेट पोलीस ठाण्यात

पालकमंत्र्यांकडून पोलिसांची झाडाझडती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे संतप्त झालेले पालकमंत्री दादा भुसे हे रात्री थेट कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाले. भुसे यांनी यावेळी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. यानंतर पोलिसांनी आयोजक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य अशा १५ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच शांतता पाळावी,असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.