NGN News
Latest Marathi News

लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचे आगमन; सरासरी मिळाला ‘हा’ दर

लासलगाव : राकेश बोरा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असून या नवीन लाल कांद्याला किमान ४०० कमाल ९०१ तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा शहरी भागामध्ये विक्री करता उपलब्ध झाल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. मागील महिन्यात सरासरी 1800 रुपये प्रत्येक क्विंटल ने विक्री झालेला उन्हाळ कांदा सध्या 1100 रुपये प्रति क्विंटल ने विक्री होत आहे मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे

या हंगामात कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने त्या तुलनेत कांद्याचा निकस कमी प्रमाणात होत आहे. कांदा निर्यातीमध्येही अनेक अडथळे येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे त्यामध्ये नाफेड एनसीएफने खरेदी केलेला कांदा किरकोळ बाजारामध्ये विक्रीसाठी येत असल्याने कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे त्यात आता नवीन लाल कांद्याची आवकही सुरू झाल्याने बाजार भाव स्थिर राहतील अशी शक्यता फारच कमी असल्याचे जाणकार सांगत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३९७ वाहनांतून ५८४० क्विंटल उन्हाळ कांदा आवक होऊन किमान ५०० कमाल १६०० रुपये तर सरासरी ११५१ रुपये प्रती क्विंटल दर मिळाले.

Comments are closed.