NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

उकल झाली ! .. म्हणून नात्यातील दर्शनाला राहुलने धाडले यमसदनी !

0

  पुणे/एनजीएन नेटवर्क

राजगडाच्या पायथ्याशी हत्या झालेल्या दर्शना पवारचा मित्र राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दर्शनाच्या हत्येनंतर राहुल वेगवेगळ्या राज्यात गेला होता. पुण्यातून फिरायला गेल्यावर राजगडाच्या पाथ्याशी त्याने दर्शनाची हत्या केल्याचे आता समोर आले आहे. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शनाची वनअधिकारी पदी निवड झाली होती. दर्शनाच्या हत्येचं कारण आता समोर आले आहे.

दर्शना आणि राहूल हे एकमेकांचे नातेवाईक होते. तसेच गेल्या दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र परीक्षेपूर्वी राहुलनेच ब्रेकअप केलं होतं. पण ती अधिकारी झाल्यावर राहुल पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता. राहूलची दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची च्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती.

लग्नाच्या हालचालीने राहूल अस्वस्थ

दरम्यान, दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या.  त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले.  मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली

Leave A Reply

Your email address will not be published.