NGN News
Latest Marathi News

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’; विक्रमी बोनस जाहीर

** मच्छिंद्र बोरसे

सातपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक औद्योगिक वसाहतीमधील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिवाळी बोनसचा आजवरचा सर्वच विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई येथे व्यवस्थापन आणि नाशिक महिंद्रा युनियन पदाधिकारी यांच्यात झालेल्या बेठकीत विक्रमी बोनस करार करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १७०० कामगारांना कमीत कमी ५० हजार तर जास्तीत जास्त १.५७ लाख रुपये बोनस दिला जाणार आहे.

यंदा कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार बोनस मिळणार आहे. या निर्णयामुळे महिंद्रा कामगारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. आहे. महिंद्रा कामगारांना मिळणा-या बोनसकडे कामगार कुटुंबीयांचेच नव्हे, तर व्यापारी वर्गाचेदेखील लक्ष लागून असते. कंपनी व्यवस्थापनबरोबर महिंद्रा कामगार युनियनचे अध्यक्ष एन.डी जाधव,उपाध्यक्ष सुनील ताठे जनरल सेक्रेटरी संजय घोडके, सेक्रेटरी जितेंद्र सूर्यवंशी,जॉईट सेक्रेटरी अजित थेटे,खजिनदार सूरज अहिरे , सदस्य मुन्ना पोर ,संतोष सावकार, यांनी व्यवस्थापणा बरोबर यशस्वी चर्चा केली. यशस्वी करारामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Comments are closed.