मुंबई/एनजीएन नेटवर्क
कोविड काळातल्या घोटाळ्यांबाबत ईडीने बुधवारी मुंबईत महापालिकेतील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आणि ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. एकूण 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सचिव सूरज चव्हाण यांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत ईडीचे चौकशी सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर हेदेखील ईडीच्या रडारवर आले आहेत. सोबतच महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या घरीही घाड टाकण्यात आली.
या धाडींमध्ये ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या हाती 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्र आली आहेत. याशिवाय 68 लाखांची रोकड आणि 1 कोटी 82 लाखांचे दागिने, तसंच 15 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही ही ईडीला सापडले आहेत. सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या.