मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी नवे पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली. सदर कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा भार कमी होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे रेपो रेट आता 5.25 टक्क्यांच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आता सरकारी आणि खासगी बॅकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या दरात कपात केली जाऊ शकते. त्यामुळे सामान्य लोकांचा गृहकर्जाचा आणि वाहन कर्जाच्या मासिक हप्त्याची अर्थात ईएमआयची रक्कम घटण्याची दाट शक्यता आहे.
Comments are closed.