घोटी/राहुल सुराणा
घोटी-खैरगांव मार्गांवर रेशनचा काळया बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा सहा लाख ३६ हजार रुपयांचा तांदूळ घोटी पोलिसांनी सापळा रचून पकडण्यात आला असून अन्य दोन जण फरार याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घोटी खैरगांव मार्गावर आयशर क्रमांक ( एमएच, १७ एजी, ५६६६ ) वाहनातून रेशनचा काळया बाजारात विक्रीसाठी तांदूळ येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजी उमाप यांना गोपनीय पद्धतीने मिळताच त्यांनी घोटी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना खबर दिली. श्री. पाटील यांनी आपल्या अतिशय धाडसी पथकातील पोलीस हवालदार सागर सौदागर, संतोष नागरे यांच्या पथकाने पहाटे पासून हेरगिरी करत परिसरात पाळत ठेवली होती.
साडे बारा वाजेदारम्यान आयशर वाहन हे रेशनचा तांदूळ खैरगांव मार्गावर खाली करण्यासाठी आला असता, पोलीस पथकाने धाडसने वाहन चालक, किन्नर यांना झडप मारत ताब्यात घेतले. पोलिसांची छापेमारी झाल्याची कळताच बाकी उपस्थित असलेल्यांनी पाठीमाघून पळ काढला. प्लास्टिक गोण्यांतुन रेशनचा तांदूळ असल्याची खात्री करत पोलिसांनी वाहन मालासह घोटी पोलीस ठाण्यात आणली. याबाबत तहसीलदार कार्यालयात कळवले असता पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार भागवत ढोणे हे उपस्थित राहत कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान संशयित आरोपी भाऊसाहेब नेरकर,श्रावण सोनवणे रा. कोकमठाण ( ता. संगमनेर ), अर्जुन मरसाळे रा. कोरपगाव यांना अटक करण्यात आली असुन अन्य दोन बेपत्ता आहेत. सहा लाख ३६ हजार रुपयांचा २७० गोण्या तांदूळ यांसह आयशर वाहनासहित १८ लाख ३६ हजार रुपा्यांचा मुद्देसूद माल पोलीस पथकाने पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.