घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी न्यायालयात शनिवारी ( दि. ९ ) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये ६०१ प्रकरणे तडजोडीकामी ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी ५३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. तसेच ३४६९ दाखल पूर्व प्रकारणांपैकी १३६ प्रकरणामध्ये तडजोडीद्वारे १ कोटी ११ लाख ९७ हजार ३९५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माधव एस बोराळे यांची पॅनल प्रमुख म्हणून आणि ऍडव्होकेट सुनील व्ही काळे यांची पॅनल मेंबर म्हणून कामे बघितले. लोकन्यायालयाची संकल्पना ही समेटातून वाद तंटे मिटविण्याची आहे. वकील पक्षकारासह बँका, पतसंस्था, महावितरण कंपनी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभाग नोंदवत खटले व वाद मिटविण्यासाठी प्रतिसाद दिला.
इगतपुरी संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट डी बी खातळे , उपाध्यक्ष ऍडव्होकेट वाय व्ही कडू, सचिव ऍडव्होकेट पी बी गायकर, खजिनदार ऍडव्होकेट सुशील गायकर, न्यायालयाचे अधीक्षक अनिल राहणे, सहाय्यक अधीक्षक पंढरीनाथ चौरे, आणि श्रीमती मीना पवार तसेच लघुलेखक लिपिक ज्ञानेश्वर पवार, लिपिक संदीप कोतूळकर, रमीझ शेख, यामिनी म्हसदे, सुषमा पिंपळे, अपर्णा वाघमारे, मयुरी पाठक आणि प्रचिती चव्हाण यांच्यासह इगतपुरी वकील संघातील सर्व वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.