NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

उमराण्यात रेशन धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रकार उघड

0

देवळा/एनजीएन नेटवर्क

तालुक्यातील उमराणे येथे शिधापत्रिकेवर (रेशन) वितरणासाठी असलेला शासकीय गोदामातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. वाहनातून सुमारे ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, उमराणे येथे महामार्गावर काळ्याबाजारात विक्रीसाठी धान्यसाठा घेऊन जाणारे वाहन विशेष पथकाला सापडले. या वाहनात तीन लाख ६० हजार रुपयांच्या सुमारे २४६ गोणी तांदूळ आणि ३७ हजार ५०० रुपयांच्या सुमारे ३० गोणी गव्हाचा साठा आढळून आला. शासकीय गोदामातील धान्याचा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. याबाबत देवळा येथील पुरवठा निरीक्षक ज्योती कपाले यांनी संशयित विजय देवरे (रा. उमराणे) आणि योगेश भामरे ( ३२, चालक, रा.खुंटेवाडी, देवळा) यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.