नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भाजप नेतृत्वाने राज्यसभेतील केंद्रीय मंत्री आणि खासदारांना सन २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भागवत कराड, धनंजय महाडिक यांच्यासारखे नेते लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणे अपरिहार्य ठरणार आहे.
भाजप नेतृत्वाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्र्यांना व राज्यसभा खासदारांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघाची निवड करून त्याची माहिती कळवण्यास सांगण्यात आले आहे. तसे झाल्यास नारायण राणे रत्नागिरी, डॉ. भागवत कराड छत्रपती संभाजी नगर आणि धनंजय महाडिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतून मैदानात उतरू शकतात.