नाशिक/एनजीएन नेटवर्क
प्राध्यापक राम घायाळ अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने निकाल सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये रामराज ज्युनिअर कॉलेज व रामराज सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
महाविद्यालयाच्या 23 विद्यार्थ्यांना 99% जास्त गुण मिळालेत तसेच 95% 56 विद्यार्थ्यांनी जास्त गुण मिळाले व 175 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90% च्या वर गुण मिळवले आहेत. यामध्ये कुमारी तनुष्का देवरे या विद्यार्थिनीला 99.77%, शुभम शिंदेला 99.71%, कौस्तुभ आहेर ९९.४६, सानिका तासकरला 99.33, ऋतुजा राऊतला 99.20 असे गुण मिळाले आहेत. ‘नीट’ या परीक्षेमध्ये समर्थ अंबुरे यास 666 गुण मिळाले, तर श्रेयश भोसले यास 637, श्रुती अरोरा 557, रहीम कुरेशी 526 असे उत्तुंग यश या परीक्षेमध्ये मिळाले. राष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी म्हणजे जेईई परीक्षेत योगराज घायाळ यास 97.88%, यज्ञेश नांदगावकर या 97.58% गुण मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्ष हर्षदा घायाळ,संस्थेचे सचिव रामकृष्ण घायाळ संस्थेचे उपाध्यक्ष श्री नितीन पाटील तसेच मोहसीन खाटीक, महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज दिंडे, डॉ. विशाल अहिरे, प्रा. विसपुते, प्रा. मयूर भोसले, मयूर देसले, प्रा. अमृता विसपुते, कुणाल डिंगोरे, लक्ष्मण वर्ड, बोराडे सर, कुलकर्णी सर, रसाळ सर, जाधव सर या सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले व भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
—————–
@ सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज कोचिंग व होस्टेल एकाच ठिकाणी मिळावे म्हणून संस्थेने सुसज्ज असे रामराज ज्युनिअर कॉलेज व होस्टेल स्थापन केले आहे. तरी या ठिकाणी अभ्यासू विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले स्वप्न साकार करावे. विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या अतुलनीय कर्तुत्वाने अभिमानास्पद असे काम केले. असेच गुणवत्तापूर्ण काम करून आपला विकास करावा म्हणजे आपोआपच आपल्या राज्याचा व देशाचा विकास होईल असे आम्हास वाटते.
- श्री राम घायाळ सर, संस्था सचिव
——————
@ या रामराज विद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव करून त्यांना उत्तुंग अशा उत्तुंग यश मिळवण्यासाठी पाठवले त्यामुळे मी या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व पालकांचा व शिक्षकांचा आभारी आहे.
- राजेश ठोके, पालक
——————-
@विद्यार्थी मित्रांनो यशाच्या उत्तुंग आभाळात नवीन क्षितीज निर्माण करण्यासाठी सतत प्रेरणा घेत रहा व पुढील आयुष्यामध्ये आपणास भरभरून यश मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे.
- प्राचार्य मनोज दिंडे
——————
@ रामराज सायन्स इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी अचक अचूक मार्गदर्शन केल्यामुळे आज मला हे दैदीप्यमान यश मिळाले आहे. या यशामुळे मी निश्चितच भविष्यामध्ये असेच यश मिळवेल. खरंच या पूर्ण टीमचे मी शतशः आभारी आहे धन्यवाद टीम रामराज
- कु. तनुष्का देवरे