मुंबई/एनजीएन नेटवर्क
भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणून राखी पौर्णिमा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा असे वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो. यंदा अधिक महिना आल्यामुळे सणवार पुढे गेले आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येकाला ओढ लागली आहे, ती भावा बहीणच्या प्रेमळ नात्याचा उत्सवाची. हा सण आता काही तासांवर येवून ठेपला आहे.
यंदा रक्षाबंधनावर भद्राचे सावट आल्यामुळे 30 आणि 31 ऑगस्ट कुठल्या दिवशी भावाला राखी बांधली तर चालणार आहे. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कधी आहे, त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा तब्बल 700 वर्षांनी रक्षाबंधनाला पंचमहायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार श्रावणी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट बुधवारी सकाळी 10.58 वाजेपासून 31 ऑगस्ट 7.05 वाजेपर्यंत असणार आहे. तर 30 ऑगस्टला सकाळी 10.58 पासून रात्री 9.01 वाजेपर्यंत भद्राची सावली आहे. भद्रकालमध्ये शुभ काम केले जात नाही. यामुळे भद्रकालात राखी बांधणे अशुभ आहे, असते असे मॅसेज व्हायरल होत आहेत.
पंच महायोग म्हणजे काय ?
१९ फेब्रुवारीपासून पंच महायोग तयार झाला आहे – शंख योग, शशा योग, वरिष्ठ योग, सर्वार्थसिद्धी योग आणि केदार योग. असा पंचयोग सुमारे ७०० वर्षांनंतर निर्माण झाला.
@ उद्या, 30 ऑगस्ट बुधवारी भावा बहीणच्या प्रेमाचा सण साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे केले जातात. शिवाय शास्त्रनियमाप्रमाणे सूर्योदयापासून 6 घटिकांपेक्षा जास्त व्यापिणी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करायची आहे.शिवाय रक्षाबंधन हा धार्मिक विधी नाही, तर हा भावाबहीण नातं वाढणाचा सण आहे त्यामुळे रक्षाबंधन बुधवारी तुम्ही पूर्ण दिवस साजरा करु शकतात. बुधवारी रात्री 9.01 नंतर तुम्ही भावाला राखी बांधू शकता. त्याशिवाय 31 ऑगस्ट 2023 ला राखी बांधणे शुभ राहील. 31 ऑगस्टला सकाळी 07.05 पर्यंत तुम्ही राखी बांधू शकता.
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक