NGN News
Latest Marathi News

राजेंद्र चांदे यांना ‘महाराष्ट्रीयन प्राइड ऑफ द इयर’ पुरस्कार

विंचूर : मच्छिंद्र साळुंके

रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ओळखले जाणारे श्री. राजेंद्र चांदे सर यांना “श्री फाउंडेशन” तर्फे राज्यस्तरीय “महाराष्ट्रीयन प्राइड ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. त्याबद्दल अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध शैक्षणिक सुविधांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल भाऊ मालपाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जगदीश जेऊघाले अनिल दरेकर, नानाभाऊ जेऊघाले, सुमनताई दरेकर,दिलीप चव्हाण, 

पांडुरंग राऊत, पि .के. नाना जेऊघाले,  विलास गोरे, जयंत साळी,  सोमनाथ निकम, राजाभाऊ गोरे,  ज्ञानेश्वर गाडे, विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे साहेब, उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे सर, पर्यवेक्षक माळी सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, शालेय समित्यांचे विविध सदस्य व रयत परिवारातर्फे श्री. राजेंद्र चांदे सर यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना पुढील उज्ज्वल, यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Comments are closed.