मुंबई/एनजीएन नेटवर्क
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (दि. २८) पार पडली. यावेळी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी संबोधित करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. अंबानी यांच्या घोषणा पुढीलप्रमाणे :
नीता अंबानी आऊट, नेक्स्ट जन..
संचालक मंडळाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. ही नियुक्ती शेअरहोल्डर यांच्या मान्यतेने मंजूर होईल. याशिवाय नीता अंबानी या बोर्डावर नसतील.
मुकेश अंबानी पाच वर्षे..
मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले की ते ५ वर्ष रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी असतील. त्यांनी सांगितले की त्यांच्या तीन जबाबदाऱ्या आहेत. यामध्ये पुढच्या पिढीच्या लिडरला तयार करणे आणि सक्षम करणे, आकाश-ईशा आणि अनंत यांना मार्गदर्शन करणे आणि रिलायन्सची अद्वितीय संस्थात्मक संस्कृती समृद्ध करणे, या गोष्टींचा समावेश आहे.
Jio 5G संदर्भात ..
रिलायन्स AGM २०२३ मध्ये केलेल्या मोठ्या घोषणांपैकी एक Jio 5G बद्दल होती. डिसेंबर २०२३ पर्यंत ही सेवा देशभरात सुरू केली जाईल.
जिओ एअर फायबर..
जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ ला लॉन्च केले जाईल. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल.
जिओ फिन विमा क्षेत्रात ..
जिओ फिन विमा क्षेत्रात प्रवेश करेल, यासाठी जागतिक नेत्यांसोबत भागीदारी केली जाईल. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून १४२ कोटी भारतीयांना आर्थिक सेवा पुरविल्या जातील. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ब्लॉकचेन आणि CBDT आधारित उत्पादने लाँच करेल, ज्यामध्ये जीवन आणि आरोग्य विमा समाविष्ट असेल.
सौर पीव्ही उत्पादन परिसंस्था..
गुजरातमधील जामनगर येथील धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सवर काम वेगाने सुरू आहे. सौर पीव्ही उत्पादन परिसंस्था तयार करणे हे आमचे प्राधान्य आहे. यासोबतच २०२६ पर्यंत बॅटरी गिगा कारखाना उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नेट कार्बन झिरोचे लक्ष्य..
२०३५ पर्यंत आम्ही नेट कार्बन झिरोचे लक्ष्य आहे. त्यासाठी हरित ऊर्जा वेगाने विकसित केली जात आहे. कार्बन फायबरमध्ये जगातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आपण जीवाश्म इंधनाकडून हरित ऊर्जेकडे वाटचाल करत आहोत.
एआय मॉडेल विकसीत करणार ..
जिओ प्लॅटफॉर्मला भारत-विशिष्ट एआय मॉडेल विकसित करायचे आहेत. ज्याचा भारताला फायदा होईल. देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत AI पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
छोट्या व्यावसायिकांना पाठिंबा ..
जिओ भारत छोट्या व्यावसायिकांना पाठिंबा देईल. त्याचे UPI इंटिग्रेशन सरकारी समर्थन मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. यामुळे सध्याच्या किमतीपेक्षा ३० टक्के स्वस्त असेल