मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला आहे तर राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांना पावसाने अशरश: झोडपून काढले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. पुढच्या 24 तासांमध्ये कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये कदाचित भरपूर पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आले आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाट परिसरात प्रचंड पाऊस पडू शकतो. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.