निलेश गौतम
डांगसौंदाणे/एनजीएन नेटवर्क
पावसाळा सुरू होऊन गत तीन महिने होऊन ही समाधानकारक पाऊस नसल्याने सर्वीकडे चिंतातुर वातावरण असताना गत तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
याआधी झालेल्या रिमझिम पावसामुळे केळझर मध्यम लघु प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला होता. दोन दिवसात झालेल्या या पावसाने या धरणातून आराम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे.आरम नदीला मोठा पूर आला आहे. डांगसौंदाणे गावाजवळील फरशी पुलाला पाणी लागले आहे.या पुरामुळे पश्चिम भागातील नदी काठावरील सर्व गावांनी समाधान व्यक्त केले आहे .तर धरणाच्या पश्चिम बाजूला असलेल्या वाठोडा केरोबा नगर येथे आरम नदीला जास्त पूर आल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.