NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन; ‘गंगापूर’मधून पाण्याचा विसर्ग

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या वरुणराजाचे गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दमदार आगमन झाले. नाशिक शहरासह अनेक तालुक्यांत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, गंगापूर धरणाच्या  पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने आज दुपाच्या सुमारास 2000 क्युसेसने  पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणही काठोकाठ भरण्याच्या मार्गावर आहे. दुपारी १०४० क्युसेसने विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. कडवा धरणातून दुपारी २१२ क्युसेक तर नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. कळवण तालुक्यात संततधारेने चणकापूर धरणासह लघू प्रकल्प तुडुंब झाले आहे. चणकापूर, पुनद धरणातील पाणी गिरणा पात्रात येत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबोली येथे सकाळी सहा वाजेपर्यंत १०२ मिलीमीटर तर इगतपुरीतील भावली धरण परिसरात सर्वाधिक १२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दारणा (३९), मुकणे (२९), वाकी (५५), भाम (३३), गंगापूर धरण समुहातील कश्यपी येथे (५२), गौतमी-गोदावरी (७७), कडवा (४१), वाघाड (२७), ओझरखेड (२८), पुणेगाव (३५), त्र्यंबकेश्वर (३२) मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.