नाशिक/एनजीएन नेटवर्क
गोविंद नगर परिसर वेगाने विकसित होत असून आर डी ग्रुप तर्फे तयार करण्यात आलेले आर डी जॉगिंग ट्रॅक, आर डी सर्कल, आर डी कॉर्नर अशी विविध विकासकामे उपयुक्त ठरणार असून शहराच्या सौन्दर्यात भर घालणारे ठरणार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी काढले.
आर डी ग्रुप तर्फे विविध विकासकामांचे लोकार्पण ना. भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी मा आमदार सीमाताई हिरे ,मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर, शिवसेनेचे जिल्हाधक्ष अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आर डी ग्रुपचे संचालक राहुल देशमुख, संचालिका सौ अंजली देशमुख, शहर अभियंता श्री वंजारी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. भुसे म्हणाले की शहराच्या विकासात उद्योगपतीनी सक्रिय सहभाग घ्यावा अश्या आवाहनाला आर डी ग्रुपतर्फे सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्तम दर्जेदार आणि सौन्दर्यपूर्ण अशी विविध कामांची निर्मिती केली असल्याचे सांगितले. आमदार सीमाताई हिरे यांनी सांगितले की केवळ आर डी ग्रुपतर्फे विकसित करण्यात आलेल्या या कामांमुळे गोविंदनगर, कर्मयोगी नगर परिसरातील नागरिकांनाच नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरातील आकर्षणाचे केंद्र ठरणारे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक करतांना आर डी ग्रुपचे चेअरमन श्री राहुल देशमुख यांनी सांगितले की आर डी ग्रुपने आज अंतराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असली तरी नाशिक ही कर्मभूमी समजून शहराच्या नाव लौकिकात भर पडेल अशा विविध विकास कामांची निर्मिती केली आहे. अगदी लेह लडाख च्या अति दुर्गम परिसरात आमच्या समूहाने पुढाकार घेऊन राष्ट्र प्रेमाच्चे स्फूलिंग तेथील विद्यार्थांमध्ये निर्माण केले. नाशिक येथे समूहाचे ठोस कार्य व्हायलाच हवे यासाठी अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला. अत्यंत अभिनव अशा आर डी सर्कलसमोर वैशिष्ट्यपूर्ण आर डी कॉर्नर रहदारीच्या रस्त्यावर नागरिकांना वेगळी अनुभूती देणारा ठरणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संकल्पक प्रवीण तिदमे ,आर्किटेक्ट रश्मी चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांस उद्योजक व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते