नाशिक/एनजीएन नेटवर्क
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधून उद्या (दि. २९) रोजी सकाळी ११ वाजता स्वच्छतेची शपथ घ्यावी व नाशिक शहर स्वच्छ,सुंदर करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन डाॅ.अशोक करंजकर,आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका व क्वालिटी सिटी मिशन नाशिकमधील सहभागी सर्व संस्था यांनी केले आहे.
नाशिकला देशातील पहिली क्वालिटी सिटी बनविण्याच्या दृष्टीने क्वालिटी सिटी नाशिक अभियाना अंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकला देशातील पहिली क्वालिटी सिटी बनविण्याच्या दृष्टीने Quality Council Of India, नासिक सिटीजन फोरम,मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक,रामकृष्ण आरोग्य संस्थान, क्रेडाई नाशिक, आय.एम.ए नाशिक बार असोसिएशन नाशिक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, बिल्डर्स असोसिएशन निमा,आयमा,NEC,CII Nashik व अन्य सामाजिक संस्था यांच्या सहभागाने हाती घेण्यात आलेल्या क्वालिटी सिटी नाशिक या अभियानातील तीन प्रमुख उद्दिष्टांपैकी स्वच्छता हे एक आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून दि. २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने त्याची सांगता होणार आहे.
या पंधरवाड्यानिमित्त क्वालिटी सिटी नाशिक अभियानाअंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छतेची शपथ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचा समावेश या स्वच्छता पंधरवड्यात करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी, सर्व शासकीय कार्यालयात सामुदायिकपणे एकाच दिवशी एकाच वेळी अर्थात दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्वच्छतेची शपथ घ्यावी अशी संकल्पना आहे. या संकल्पनेस साथ देऊन, सक्रिय सहभाग नोंदवून अभियानात आपल्या संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, सामाजिक संस्था यांनी आपापल्या संस्थेत, कार्यालयांत या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळी सामुदायिकपणे स्वच्छतेची शपथ घ्यावी तसेच या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते qualitycitynashik@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत अथवा 7021174981 या नंबरवर व्हॉटस्अप करावेत असे आवाहन समाजकल्याण उपायुक्त तथा नोडल ऑफिसर क्वालिटी सिटी नाशिक प्रशांत पाटील यांनी केलेले आहे.