जयपूर/एनजीएन नेटवर्क
एका महिला अधिकाऱ्याने अवघ्या एका दिवसात 5 कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे याची नोंदणीही अवघ्या दोन दिवसात करण्यात आली. या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे ज्योती भारद्वाज. 26 फ्लॅटपैकी 15 फ्लॅट ज्योती भारद्वाजने स्वत:च्या नावावर तर 11 फ्लॅट मुलगा रोशन वशिष्ठच्या नावावर खरेदी केले. या घरांची नोंदणी अधिकाऱ्यांना आदेश देत अवघ्या 48 तासात करण्यात आली
ज्योती भारद्वाज राजस्थानच्या जयपूर सचिवालयात शासन सचिव पदावर कार्यरत आहे. ज्योती भारद्वाज यांच्या भ्रष्टाचाराचे कारनामे बाहेर आल्यानंतर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे.
ज्या फ्लॅटच्या खरेदीसाठी ज्योती भारद्वाजने बिल्डरला धनादेश दिलेत, ते धनादेश आज दिड वर्षानंतरही बँकेत वटवण्यात आलेले नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपल्या संपत्ती माहिती देणं भाग असतं. पण ज्योती भारद्वाजने 26 फ्लॅट्सची माहिती दिली नव्हती. या सर्व फ्लॅटची माहिती तीने लपवली होती. सरकारी माहितीत तिने केवळ आपल्याकडे तीन घरं असल्याचं म्हटलं आहे. यात पतीने कर्ज काढून एक घर घेतल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या घरासाठी आपण स्वत: लोन काढण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. . पण सब जयपूरच्या रजिस्टर कार्यालय 4, 5 मार्च 2022 रोजी ज्योती भारद्वाजच्या नावावर 26 फ्लॅट्सची नोंदणी झाली आहे. ज्याची किंमत 4 कोटी 71 लाख रुपये आहे. या घरांसाठी 30 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी तीने भरली आहे.