नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज गुरुवार (२५ सप्टेंबर) रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, कार्यकारी अभियंते योगेश निकम, चेतन वाडे, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Comments are closed.