NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

तक्रार अर्ज देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाचे अत्याचार

0

राहुरी/एनजीएन नेटवर्क

पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेवरच येथील पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. 

 प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यात गेले होती. त्यावेळी एक अनोळखी इसमाने याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यास भेटण्यास सांगून, ते तुमचे काम करतील असे सांगितले. त्याचबरोबर संबंधित साहेबांचा नंबरही त्यांनी दिला. त्यानंतर संबंधित फोन नंबरवर कॉल केला असता दोन दिवसानंतर साहेब येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांनंतर राहुरी पोलीस स्टेशनला आले, तेव्हा समजले की ते रिटायर झाले आहेत म्हणून पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नऱ्हेडा यांच्याकडे तक्रार सांगितली. यावेळी नऱ्हेडा यांच्याकडून महिलेला नको ते प्रश्न विचारात भंडावून सोडले.

काही दिवसांनंतर तक्रार अर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी कॉल केला असता, ऑफिसमध्ये येऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली. मात्र यावेळी देखील पीएसआय नऱ्हेडा यांनी माझ्या नंबरवर मेसेजेस करण्यास सुरुवात केली. तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर असे संदेश पाठवून जबरदस्ती केली. व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज पाठवून रुमवर नेत बळजबरीने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरुन संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.