नाशिक/एनजीएन नेटवर्क
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा शहर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी बिग्रेडच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानकाजवळ शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन केले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शिवाजी महाराज पुतळ्यानंतर मेहेर सिग्नल परिसरात मोर्चा वळविला. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून टायर जप्त केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. नाशिकरोड येथेही माजी मंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात काही ठिकाणीही आंदोलनाची धग पाहायला मिळाली.