- नाशिक मंडळातील अभियंते, अधिकाऱ्यांशी बैठकीत साधला संवाद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची राज्यात पुनर्रचना करण्यात आली असून, या माध्यमातून ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कामांचा ताण कमी होणार आहे. या माध्यमातून नाशिक मंडळामध्ये ग्राहकांना अधिक तत्परतेने सेवा देण्यासाठी कार्यरत राहण्याचे राहण्याचे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी अधिकारी व अभियंते यांना केले. नाशिक शहर विभाग १ च्या कार्यालयात सोमवारी ( दि. २० ) रोजी नाशिक मंडळातील अभियंते व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली याप्रसंगी बोलत होते.
संचालक राजेंद्र पवार यांनी सदर बैठकीत पुनर्रचनाबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना विस्तृत मार्गदर्शन करीत पुनर्रचना संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे व व शंकांचे निरसन केले. पुनर्रचनेमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून पर्यायाने वीजग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा आणखी गतिमान होणार असल्याचे सांगितले.
या बैठकीमध्ये उपस्थित मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी मानव संसाधन संदर्भात तर मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी वितरण विषयी तसेच मुख्य अभियंता प्रविण परदेशी यांनी सामग्री व्यवस्थापन या संदर्भात विस्तृत माहिती बैठकीत दिली. यावेळी संचालक राजेंद्र पवार यांनी विद्युत भवन आवारात असलेल्या ग्राहक सुविधा केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली. बैठकीला अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता चेतन वाडे, योगेश निकम व जगदीश जाधव यांचेसह अभियंते, अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.