NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

शिवसेनेला तेव्हा जादा मंत्रीपदांची ऑफर, मुख्यमंत्री पदाची नव्हे..फडणवीस

0

भिवंडी/एनजीएन नेटवर्क

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतची युती का तुटली याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले गेलेच नव्हते. त्या रात्री भाजप नेते अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याचा खुलासा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

भाजपतर्फे महाविजय 2024 अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत भिवंडीत आमदार, खासदारांचे प्रशिक्षण वर्ग भरवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री भाजपचा होईल असा निर्णय झाला होता. तसेच अमित शाह यांनी शिवसेनेला जादा मंत्रीपदांची ऑफर दिली होती. ठाकरेंना अमित शाहंनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता अस फडणवीस यांनी सांगितले. आम्ही जेव्हा जिंकत होतो, तेव्हा मी नागपुरातून उद्धव ठाकरेंना फोन केला होता की एकत्र पत्रकार परिषद घेऊ. यावर ठाकरेंनी मला मी आता घेतोय तुम्ही नंतर घ्या असे सांगितले होते. यावेळी वहिनींसमोर पत्रकार परिषदेचा सराव केला. त्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व दरवाजे मोकळे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मला जेव्हा मध्यरात्री ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते. मी शहांना तेव्हाच फोन केला होता, त्यांनी तसे काही ठरले नसल्याचे सांगितले. मी परत उद्धव ठाकरेंना फोन करून हे सांगितले होते. तेव्हा त्यांनी युती शक्य नसल्याचे कळविले आणि एका झटक्यात युती तोडली. 

अमित शहांचा हा सल्ला

2019 साली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानी शिवाय याला दुसर काही म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून मते मागीतले. त्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेद्वारांना जिंकवून देण्यासाठी घाम गाळला. शिवसेनेने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे.  अमित शहा म्हणाले दहा अपमान सहन कर पण बेईमानी सहन नको करुस. बेईमानी सहन करणारे राजकारणात टिकत नाहीत. 

Leave A Reply

Your email address will not be published.