नाशिक/एनजीएन नेटवर्क
प्राध्यापिका,सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका वंदना जाधव-रकिबे यांच्या ‘मेनोपॉज’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. ११) सायंकाळी ४.३० वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.
गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर थोरात सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे,आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष सुनील ढिकले, सरचिटणीस नितीन ठाकरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, भुजबळ नॉलेज सिटीच्या विश्वस्त शेफाली भुजबळ, अशोका ग्रुपच्या आशा कटारिया, ए एम एस एस ए आयच्या संचालिका अंकिता पारख तसेच स्त्री रोग तज्ञ डॉ.निवेदिता पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रकीबे व जाधव परिवाराने केले आहे.
प्रा. वंदना उदय रकिबे या के. टी. एच. एम. महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स शाखेत गेल्या ३४ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी इलेक्ट्रोनिक प्रक्टिकल बुक सह अनेक पुस्तकांचे लेखन केले असून विविध वृत्तपत्रातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. याबरोबरच रेडीओ आणि दूरचित्रवाणी माध्यमातून देखील त्यांनी विविध विषयांवर प्रबोधन केले आहे. त्यांना भारतरत्न मदर तेरेसा पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार,महाराष्ट्र भूषण, राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार, सुकन्या पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार आदि विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
@ऋतुचक्र समाप्ती म्हणजेच मेनोपॉज, त्याला रजोनिवृत्ती म्हटले जाते. या काळात शरीरात विविध बदल होतात. त्याबद्दल अनेक समाज गैरसमज देखील आहेत ते दूर करून त्याची शास्त्रीय माहिती देऊन जागृती करण्यासाठी हे लेखन केले आहे.
- प्रा. वंदना रकिबे, लेखिका