NGN News
Latest Marathi News

काँग्रेस प्रदेश सचिवपदी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांची नियुक्ती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व केंद्रीय विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या मान्यतेने राष्ट्रीय सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्याचे प्रा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड हे मागील २३-२४ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यरत असून नाशिक तालुका काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा कार्यकारी सरचिटणीस, जिल्हा प्रवक्ता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व आ.नानाभाऊ पटोले यांच्या कार्यकारिणीत देखील त्त्यांनी अहिल्यानगर ग्रामीण जिल्हा प्रभारी,नंदुरबार जिल्हा निरीक्षक,विधान परिषद निवडणूक प्रभारी आदींसह विविध जबाबदाऱ्या हाताळलेल्या आहेत.संघटनात्मक कामकाजासोबतच समाजहिताच्या प्रश्नांवर ते सातत्याने लढा देत आलेले आहेत.

या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ.नानाभाऊ पटोले,विधानसभा गटनेते आ. विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते आ. सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील,खा. डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे,शरद आहेर, जिल्हा अध्यक्ष मा. आ. शिरीष कोतवाल,शहराध्यक्ष आकाश छाजेड, राहुल दिवे, रमेश कहांडोळे, दिगंबर गीते, सुमित्रा बहिरम आदींसह अनेक मान्यवरांनी प्रा. गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

—————————-

“माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्व – खा. मल्लिकार्जुन खरगेजी,खा. राहुल गांधीजी, व प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ व बाळासाहेब थोरात यांचे मनःपूर्वक आभार मानतो. काँग्रेस पक्षाचे मूलभूत विचार – लोकशाही, समानता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता – हेच माझ्या कार्याचा आधार आहेत. पुढील काळात जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक बळकट करणे, युवकांना संधी उपलब्ध करून देणे व वंचित घटकांसाठी लढा देणे हे माझे प्राधान्य राहील. काँग्रेस पुन्हा सक्षम पर्याय ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहीन.”

  • प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, प्रदेश सचिव

Comments are closed.