मुंबई/एनजीएन नेटवर्क
वादग्रस्त संवादाचा आक्षेप नोंदवल्यानंतर ‘आदिपुरुष’ सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असे मुंतशीर म्हणाले. ‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमावर टीका होत आहे. जेव्हा रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येताना दाखवला गेला तेव्हा ट्रोलिंगला सुरुवात झाली. सिनेमातील रावण हा अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखादा मुघलकालीन क्रूर शासक असावा अशा पद्धतीने रेखाटला गेला. ‘आदिपुरुष’ सिनेमातील हनुमानाची प्रेक्षकांना उत्सुकता होता. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरू केली.