NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

चांदवड टोलनाक्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा; कर्मचाऱ्याच्या मुसक्या..

0

चांदवड/एनजीएन नेटवर्क

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यास तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. शेहबाज कुरेशी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगरूळ टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याची घटना घडली. त्यामुळे टोलनाक्यावर काम करत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आश्चर्य व्यक्त केले. तातडीने स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच टोल प्रशासनाने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित केले. टोलनाक्यावरील कर्मचारी शेहबाज कुरेशी याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.