NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जिल्हा औद्योगिक क्षेत्रांतील प्रश्न मार्गी लागणार; अधिकाऱ्यांचे आश्वासन

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

माळेगाव(सिन्नर) येथील औद्योगिक वसाहतीतील पाणीप्रश्न,रस्त्यांची दुरवस्था, घंटागाड्या,कचऱ्याची विल्हेवाट,पथदीपसह तेथील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून निमाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊन विविध प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांवर केली. दरम्यान हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील,असे आश्वासन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे यांनी दिले.

      सिन्नर -माळेगाव तसेच तळेगाव- अक्राळे या दिंडोरी तालुक्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली निमाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन विविध मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा केली.

    माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवावी हा मुद्दा चर्चेला आला. 14एमएलडी वरून ही मर्यादा 20 एमएलडी करावी, पाण्याचा दर्जा सुधारावा  असा आग्रह उद्योजकांनी धरला असता सध्याचे जे आरक्षण आहे ते पुरेसे आहे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले.परंतु भविष्यातील उपलब्ध लक्षात घेऊन ही मर्यादा वाढविणे गरजेचे आहे असे निमा पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले असता त्यात काही अडचण नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ब्रेकडाऊन आणि मेन्टेनन्सच्या बाबतीतही यावेळी चर्चा झाली मेंटेनन्सच्या नावाखाली दोन दोन दिवस पाणी बंद राहते असे निमा पदाधिकाऱ्यांनी सांगितले असता भविष्यात असा प्रकार होणार नाही याची हमी अधिकाऱ्यांनी दिली.

नुकतेच निमाच्या पाठपुराव्यानंतर  9 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले माळेगाव औद्योगिक  वसाहतीतील रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहेत, व अत्यंत तुरळीक पावसानंतर लगेचच  मेनरोडचा अक्षरशः भुगा झाला आहे,असे लक्षात आणून दिले असता हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले असता सदरील कॉन्ट्रॅक्टरला नोटीस बजावी व वेळप्रसंगी त्याला क***** यादी टाकावी अशी मागणी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी केली, माळेगाव औद्योगिक वसाहतीत ‘जे’ ब्लॉक विकसित करताना उद्योजकांना त्यांच्या कंपनीत जाण्यासाठी एमआयडीसीने त्यांना रोड उपलब्ध करून देणे गरजेचे होते.उद्योजकांना भूखंडाचे वाटप झाले मात्र  सर्व्हिसरोडची मागणी अजूनही प्रलंबित आहे.याकडे लक्ष वेधले असता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.तसेच या वसाहतीतील काही रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरून निमाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. ठेकेदारांना नोटीसा द्या,त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी आली असता त्याबाबत वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी नक्कीच याबाबत कार्यवाही करू असे  सकारात्मक उत्तर दिले.

    माळेगाव औद्योगिक वसाहतीतील प्रवेशद्वार कमान उभारण्यास मंजुरी मिळावी ही मागणीही यावेळी मान्य करण्यात आली.वसाहतीत चोऱ्यांचे प्रमाण मोठयाप्रमाणात वाढल्याने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे एमआयडीसी मार्फत  बसविण्याची मागणी निमा पदाधिकाऱ्यांनी केली असता संयुक्तरित्या हा उपक्रम राबविण्याचे मान्य करण्यात आले.अंबड,सातपूर औद्योगिक वसाहतीप्रमाणेच माळेगाव औद्योगिक वसाहतीतही माहितीचे दिशादर्शक बोर्ड उभारण्याचे बैठकीत ठरले. पाणी बिल संकलन केंद्राची वेळ वाढवून मिळावी. अनेकदा तेथे कर्मचारीच उपस्थित नसतात. तसेच पाच मिनिट उशीर झाला तरी तेथे बिल स्वीकारले जात नाही आदी तक्रारींचा पाढा निमाच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला असता ती वेळ वाढवून देण्याचे तसेच बिल भरायला आलेल्या व्यक्तीस परत न पाठविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.पथदीपांचा मुद्दा चर्चेस आला असता 7 दिवसांच्या आत 100%  पथदीप सुरू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. घंटागाड्या आणि कचऱ्याची विल्हेवाट यावरही गंभीर चर्चा झाली. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिन्नर नगरपालिका किंवा नाशिक महानगरपालिका यांच्याशी टायअप करण्याची सूचना निमा पदाधिकाऱ्यांनी केली असता त्याचा विचार करण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले. अत्यंत महत्त्वाच्या अश्या ट्रक टर्मिनसच्या  विषयावरही यावेळी चर्चा झाली. त्यासाठी रोड फ्रंट च्या जागा ताब्यात घेण्यात येतील व ट्रक टर्मिनस चा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान शिंदे पळशे येथे बंद असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या जकात नाक्याच्या जागेवर ट्रक टर्मिनस ची  व्यवस्था करणे शक्य आहे. त्याबाबत महापालिकेशी चर्चा करा असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सुचविले असता त्याचा गांभीर्याने विचार करू असे आश्वासन गवळी आणि झांज्जे यांनी दिले. माळेगाव औद्योगिक वसाहती करता अतिरिक्त  विद्युत सबस्टेशन उभारण्याच्या करिता ॲम्युनिटीचा प्लॉट देण्याबाबतच्या  मागणीबाबत  गवळी यांनी तातडीने लक्ष घालून निर्णय  घेण्याचे आश्वासन दिले.

    या बैठकीत दिंडोरी तालुक्यातील आक्रळे -तळेगाव औद्योगिक वसाहतीत भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतही साधक बाधक चर्चा झाली. विद्युत सबस्टेशन,फायर स्टेशन,ट्रक टर्मिनस,सीईटीपी प्रकल्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अंबड सातपूर व सिन्नर येथे येत असलेल्या अडीअडचणी या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये होऊ नये तसेच माळेगावला लागून होत असलेल्या  अतिरिक्त माळेगाव एमआयडीसीच्या  जागेमध्ये सुद्धा या अडचणी येऊ नये यासाठी आधीच तरतूद करून ठेवण्याची चर्चा व निर्णय या बैठकीत झाला 

     या चर्चेत निमाचे सचिव राजेंद्र अहिरे,उपाध्यक्ष आशिष नहार,किशोर राठी,कोषाध्यक्ष विरल ठक्कर,किरण वाजे,सुधीर बडगुजर,प्रवीण वाबळे,नितीन वागस्कर, मनीष रावल,सचिन कंकरेज,कैलास पाटील,गोविंद झा, सतीश कोठारी,समीर देशमुख,एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे,सिन्नरचे उपअभियंता मनोज पाटील व शशिकांत पाटील,अंबडचे उपअभियंता जयवंत पवार तसेच अन्य अधिकारी यांनी सहभाग घेतला.

——————

बेळे यांच्याकडून अधिकारी फैलावर

   बैठकीत बैजबाबदार आणि उडवाउडवीची उत्तरे देणारे नवनियुक्त उपअभियंता मनोज पाटील यांना निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अक्षरशः फैलावर घेतले. कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही बेळे म्हणाले.

ReplyForward
Leave A Reply

Your email address will not be published.