NGN News
Latest Marathi News

कांदा धोरण समिती बैठकीत शेतकरीहिताची मुद्दे मांडणी; जगताप दाम्पत्य सहभागी..

लासलगाव : राकेश बोरा

राज्यातील कांदा दरात स्थिरता निर्माण करणे, शेतकरी, ग्राहक व व्यापाऱ्यांचे समतोल हित जपणे आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कांदा धोरण समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधींनी ठोस भूमिका घेत शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले.

या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप आणि माजी सभापती सौ. सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी यावर्षी कांद्याच्या उत्पादनात झालेली विक्रमी वाढ, इतर राज्यांमधून लवकर आलेली आवक आणि त्यामुळे येणाऱ्या काळात दर घसरण्याची शक्यता याकडे लक्ष वेधले.

या बैठकीत बाजारभावात घसरण टाळण्यासाठी तातडीच्या अल्पकालीन उपाययोजना राबवाव्यात, देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त कांदा प्रक्रियेसाठी व निर्यातीसाठी वळवावा,नव्या निर्यात बाजारपेठा विशेषतः युरोप व अमेरिकेतील शोधाव्यात,कांद्याच्या चाळ व साठवण क्षमतेत वाढ करावी,नाफेडमार्फत थेट बाजार समित्यांमध्ये प्रभावी खरेदीसाठी उपाययोजना कराव्यात यावर डी के जगताप आणि सुवर्णा जगताप यांनी चर्चा केली

Comments are closed.