नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
एलपीजीवर स्वयंपाक करणाऱ्यांना मोदी सरकारने दरकपातीची भेट दिली आहे. सरकारने स्वयंपाकाच्या १४ किलोच्या गॅसच्या किमतींमध्ये २०० रुपये प्रति सिलिंडरची कपात जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीवर २०० रुपये प्रति सिलिंडरची कपातीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
CNBC-Awaaz ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सरकार गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅसवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा आढावा घेत आहे. त्याच्या किमतींबाबत पंतप्रधान कार्यालयातही आढावा घेण्यात आला आहे. एलपीजीच्या दरात कपात करण्यावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानंतर आता अनुराग ठाकूर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.माहितीनुसार, मंत्रिमंडळाने सिलिंडरवर अतिरिक्त अनुदान मंजूर केले आहे. २०० रुपये प्रति सिलिंडरचे अतिरिक्त अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे प्रति सिलिंडर २०० रुपयांची कपात जाहीर केली आहे.