- डोंगऱ्यादेव उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
साकी तालुक्यासह धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी पश्चिमपट्यातील चौपाळे,रोहोड,डनुमंतपाडा, चिंचगावठाण आणि पंचक्रोशीतील आदिवासी गाव-पाड्यांमध्ये मार्गशीर्ष चंद्रदर्शनानंतर सुरू झालेल्या निसर्गदेव डोंगऱ्यादेव पुजन प्रत-उत्सवाची सांगता पार पडली.दिड आठवडा आदिवासी परिसरात पारंपरिक बासरीचा नाद घुमत राहिला,तर डोंगर दर्यामधुन झालेल्या माऊलींचे आगमन झाल्यानंतर गावोगाती भक्तिभावाचे वातावरण अधिक वाटले.
26 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या चार्मिक विधींनंतर 15 दिवस उपवास,नित्यनियम पाळणाऱ्या आदिवासी भगिनींनी गडावर पूजा-अर्चा करून माऊलीची प्राणप्रतिष्ठा गावात आणली माऊली परत आल्यानंतर महिलांनी आरती करून स्वागत केले.त्यांनंतर धानपूजन,नवस,स्थापण्या, शालू बांधणे,प्रसार व भंडारा अशा परंपरागत विधीनी परिसरात आनंदोत्सवाचे आनंचेत्सवाचे वातावरण डोंगर-गन्धनले संपूर्ण आदिवासी समाजाने सामूहिकरित्या हा उत्सव पारंपरिक शिस्त आणि श्रद्धेने पार पाडला.
उत्सवादरम्यान काही आदिवासींना अंगात वारे येणं,हे दृश्य सहसा दिसते. अनेकजण याला अंधश्रद्धेची छटा लावतात.मात्र स्थानिकांच्या मते हे अंधश्रद्धा नसून चेतनेचा जागृत क्षणं असतो.मनापासून ध्यान, चितन,संपूर्ण श्रध्दा आणि भक्तीभावाने पूजा केली की शरीरातील ज्ञानेंद्रिये सक्रिय होतात.त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या ऊजेंच्या लहरीमुळे अंग थरथरते,काटे येतात आणि भावनिक प्रतिसाद दिसून येतो.ही अवस्था म्हणजे ‘देव चेतना’ भावना मानली जाते. पंचमहाभूतांपासून बनलेल्या मानवी शरीरातील शक्ती जागूत जीणे असेही याचे वर्णन केले जाते.
संस्कृतीचे जतन
आजच्या डिजिटल मुद्यातही आदिवासी समाजातील तरुण,शिक्षित आणि नोकरदार मंडी परंपरेचे काटेकोरपणे पालन करतात, ही पिशेष बाप.उत्सवाच्या काळात कोणात्याही प्रकारचे अभंग होऊ से गासाठी मोठी काळी घेतली जाते.निसर्ग आणि मानवाला देस रूपात पाहाण्याची आदिवासींची अनीखी संस्कृती आजही जिवंत आहे.
‘डोंगऱ्यादेव ‘चे सांस्कृतिक महत्व
‘डोगन्यादेव’ उत्सवाला सांस्कृतिक महत्त्व आहे. कोकणी मावची,भिल्ल, पावरा,कुकना, बारली यांसारख्या जमाती हा उत्सव साजरा करतात.वत हे पूर्णपणे सामुदायिक असल्याने गावांमध्ये एकोपा आणि ऐक्य दृढ होते.अनेक सरकारी प्रकरणांमध्येही आदिवासींना डोगन्यादेवाची शपथ प्यायला लावली जाते,यावरून या देवतेचे स्थान स्पष्ट होते.उत्सवादरम्यान गावागावात घुमणारे डोगन्यादेव वळीत गाण ही आदिवासी संस्कृतीची खास ओळख आहे.
कठोर तपश्चर्या
सातपुडा आणि सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्या खोऱ्यात राहणान्या आदिवासींचे जीवन खडतर असले तरी सामुदाईक उत्सव आणि संस्कार जपण्याची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पाळली जाते.मार्गशीर्ष पोर्णिमेच्या गड दर्शनानंतर पंधरा दिवस चाललेला डोंगऱ्यादेव उत्सव गावोगावी भक्तिभावाने पार पडला. परंपरा,श्रध्या,एकोप्याचा आणि निसर्गपूजेचा अनोखा संगम असलेला हा उत्सव आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक ठरला आहे.
Comments are closed.