मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची पंधरा वर्षांपूर्वी झालेली त्या दोघांची मैत्री आजही कायम आहे. आता त्यांनी या मैत्रीला पुढे नेण्याचा निर्णय घेत प्रेमाची कबुली दिली आहे.
‘सा रे ग म प’नंतरही प्रथमेश आणि मुग्धा यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम एकत्र केले आहेत आणि अजूनही करत आहेत. त्या व्यतिरिक्त अनेकदा ते दोघे एकत्र दिसतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज त्यांचा चाहत्यांना होता. तर चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर करत त्यांचं नातं जाहीर केलं आहे. त्या दोघांनी त्यांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत लिहिले, “तुम्ही सर्व ज्या बातमीची वाट बघत होतात ती अखेर आम्ही सांगत आहोत. आमचं ठरलंय!” याचबरोबर त्यांनी या पोस्टला एम गॉट मोदक, मोदक गॉट मॉनिटर, फॉरएव्हर, कपल्स गोल्स हे हॅशटॅगही वापरले. त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच तुफान व्हायरल झाली.