मुंबई/एनजीएन नेटवर्क
निवृत्त ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिघावकर यांनी पक्ष प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिघावकर यांनी नवी राजकीय इंनिग सुरु केल्याचे मानण्यात येत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीन निवडणुकीत धुळ्यात भाजपने गड राखला आहे. प्रारंभी प्रतापदादा सोनवणे आणि नंतर दोनदा डॉ. सुभाष भामरे यांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे. २०२४ मध्ये भाजप पुन्हा भामरे यांना संधी देते का की भाकरी फिरवत दिघावकर यांना मैदानात उतरवते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान, प्रवेश सोहळ्याप्रसंगी आ. दिलीप बोरसे, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.