भगूर /दीपक कणसे
प्रेस कामगार नेते गुणवंत कामगार संघटनेचे प्रदेश सदस्य, भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कापसे यांना उत्तर महाराष्ट्र वंजारी समाजाच्या वतीने गोपीनाथ गड येथे समाज महामेळाव्यात समाजभूषण पुरस्कार आमदार गोविंदराव केंद्रे, नरेंद्र दराडे माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक कार्यात शरद अग्रेसर असलेले तसेच इंडिया सेक्युरिटी प्रेस युवक मंडळाच्या माध्यमातून विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी यासह विविध सामाजिक आरोग्य विषयक शिबिर राबविणे तसेच समस्त वंजारी सेवा मंडळातर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेणे आदींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कापसे यांच्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्र वंजारी समाजातर्फे गुणवंत कामगार नेते प्रशांत कापसे यांना समाज भूषण पुरस्काराने महामेळाव्यात सन्मानित करण्यात आले. कापसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, व्यापारी बँकचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड,जेष्ठ नेते निवृत्तीराव अरिंगळे,भा,ज,प अध्यक्ष गिरीश पालवे, महाराष्ट्र साहित्य परिषद रवींद्र मालुंजकर, सा,वा,ना चे पदाधिकारी संजय करंजकर,स्वा,सावरकर समितीचे प्रताप पवार,रमेश पवार नाट्य परिषद नाशिकचे सुनील ढगे,सा,वाना चे धर्माजी बोडके,जयंत जातेगावकर,नाशिक मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे,उपाध्यक्ष प्रवीण आडके,दिपक कणसे,भगुर देवळाली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर,उपाध्यक्ष भास्कर सोनवणे,प्रमोद राहणे,प्रशांत धीवंदे,संजय निकम,गोकुळ लोखंडे,गुरू स्पोर्ट्सचे राजाभाऊ सोनवणे,शिबु जोश मास्टर स्पोर्ट्स क्लबचे विलास जाधव,अनिल दिवाने,नंदुरबार आर,टी,ओ उत्तम जाधव, नाशिक आर, टी, ओ हेमंत हेंम्बाडे,जयंत गाडेकर,वसंत पाटील आदींनी अभिनंदन केले.