NGN News
Latest Marathi News

‘प्रांजल’चे प्रताप..सिनेमातील कामाचे आमिष दाखवत मुलींसोबत लैगिक अत्याचार  

पुणे : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्य महिला आयोगाकडे प्राप्त तक्रारीनुसार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रांजल यांनी मुलींना सिनेमामध्ये काम देतो म्हणून गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी बोलवल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचेही समोर आल्याने अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडीत छापा टाकत कारवाई करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर आणि त्यांचा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन गांजा, दहा मोबाईल, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. हडपसरच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले होते. यासंदर्भात, सानवी संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली.

मुलींना विवस्त्र करुन व्हिडिओ काढले

मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये शेकडो व्हिडिओ, १४९७ फोटो नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करुन नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे फोटो, व्हिडिओ आहेत. या मुलींना पटवण्यासाठी आरूष नावाचा माणूस ठेवला होता. चित्रपटात काम देऊन त्या मुलीना बोलवलं जात होत. यात मानवी तस्करी झाली आहे, त्यामुळे आता एसआयटी स्थापन कारणासंदर्भात पत्र दिल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली. 

——————————

@ हे फार मोठं रॅकेट आहे, हे उघडकीस येईल, अनेक व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींचा वापर केला गेला आहे.पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी, काही मुलींनी तक्रार दिली आहे. अनेक वर्षांपासून सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात असून लोणावळा,जळगाव, साकीनाका येथे हे सगळं प्रकरण सुरू होते.

  • रुपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग

Comments are closed.