NGN News
Latest Marathi News

देवळाली कॅम्प शिवजन्मोत्सव सोहळा समितीअध्यक्षपदी प्रमोद मोजाड

  • कार्याध्यक्ष म्हणून किरण बेरड यांची निवड

** पुरुषोत्तम कांडेकर

देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क

देवळाली कॅम्प शहर सार्वजनिक शिवजन्मौउत्सव समिती -२०२६ अध्यक्षपदी प्रमोद मोजाड तर कार्याध्यक्ष किरण बेरड यांची सर्वांनुमते एकमताने निवड करण्यात आली. मावळते समितीचे माजी अध्यक्ष सतिष कासार यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मौउत्सव समिती बैठकीचे आयोजन देवळाली कॅम्प सिंधी पंचायत सभागृहात बैठक आयोजित करण्यांत आली होती. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड मा उपाध्यक्ष दिनकर पाळदे यांनी प्रमोद मोजाड यांच्या नावाची सुचना केली यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी प्रमोद मोजाड यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.

यावेळी जेष्ठ सभासद पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, गोकुळ मोजाड, साहेबराव चौधरी, रतन पाळदे आदींसह सभासद आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी सांगितले सर्व सामान्यांसाठी उपयुक्त सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार जयंती साजरी करण्यात येणार येऊन सर्वांना सोबत घेऊन शिवजन्मौउत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करणार असल्याचे सांगून टाकलेल्या विश्वासात बद्दल आभार व्यक्त केले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला .सुञसंचलन संदीप चौधरी तर आभार गोकुळ मोजाड यांनी मानले.

Comments are closed.