NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रमोद चौगुले, सोनाली म्हात्रे राज्यात प्रथम..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

 गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल दिनांक आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 405 पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनां दिल्या असल्याची माहिती आयोगाने कळवले आहे. या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 

राज्यसेवा 2021 सालचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये बीडच्या सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.