NGN News
Latest Marathi News

‘महावितरण’ नाशिकरोड कार्यालयात प्रबोधनकारांना अभिवादन

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज बुधवारी (१७ सप्टेंबर) रोजी प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षवर्धन जगताप, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी, व्यवस्थापक हेमंत भामरे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपकार्यकारी अभियंता तुषार राणे, सहाय्यक अभियंता सागर खांबाईत, दीपक गडलिंग, उपव्यवस्थापक श्रीकांत ढाकणे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.