NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राज्यातील 82,631 सहकारी संस्था निवडणुकांसाठी आता नवा मुहूर्त..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

  राज्यातील सहकारी संस्थांच्या 30 जूननंतर होणाऱ्या निवडणुका आता 30 सप्टेंबर नंतर होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा  निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण जाते. तसंच, शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. या सर्व कारणांमुळे सावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे . राज्यात 82,631 सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर 2023 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.  पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

राज्यात 30 जूननंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असते. तसेच, सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकींमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.