NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ‘खाकी’चा घेणार आधार !

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी आणि नदीची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून बंदोबस्त दिला जाणार आहे. गोदावरी शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली असून, या समितीची बैठक आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही माहिती देण्यात आली. 

गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह कायम टिकून राहिला पाहिजे, या ‘निरी’च्या सूचनेवरही चर्चा करण्यात आली. पाण्याचा प्रवाह टिकविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची सूचना पंडित यांनी केली आहे. त्यानुसार मोहीम राबविण्याचे ठरविले. सध्या गोदावरीच्या संरक्षणासाठी पूर्णवेळ कर्मचारी नसून तशी माहिती उच्च न्यायालयाला देण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या. त्याचप्रमाणे अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमधून रासायनिक मलजल प्रक्रिया केंद्र सुरू न करण्यात आल्याने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीलाही कळविण्याचे निर्देश गमे यांनी दिले. 

Leave A Reply

Your email address will not be published.