अहमदनगर/एनजीएन नेटवर्क
पारनेर पोलिसांनी काळ्या जादूच्या नावाखाली आजार बरे करण्याचे अमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार करून पाच लाख रूपयांची फसवणुक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक केली आहे. योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे असे पकडण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. या भोंदूबाबाने देवऋषी असल्याचे भासवून पारनेर तालुक्यातील एका कुटुंबियाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
भोंदूबाबाने कुटुंबातील सदस्यांना घरातील अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्यास सांगितले. तसंच, त्यासाठी पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन फसवणूक केली. तसंच, त्याच घरातील महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोंदू बाबा विरूद्ध पारनेर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा, नरबळी, इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.