नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील सुप्रसिध्द लेखिका तथा कवयित्री स्नेहा शिंपी यांना राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. बुलढाणास्थित एका प्रतिथयश संस्थेच्या वतीने ऑनलाईन आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातील ३५१ कवींनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये कवयित्री स्नेहा शिंपी यांची अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील काव्यरचना स्पर्धा परीक्षकांच्या प्रथम पसंतीस उतरली.
स्नेहा शिंपी यांना आजवर आपल्या साहित्य कृतींसाठी राज्यस्तरावर अनेकदा प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दरम्यान, आताच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेतील प्रथम पुरस्काराबाबत त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.