NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

धक्कादायक ! स्वातंत्र्यदिनी त्यांना मुंबई, पुण्यात घडवायचे होते स्फोट ..

0

पुणे/एनजीएन नेटवर्क

दशतवाद्यांनी पुणे अन् मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा कट आखला होता. येत्या १५ ऑगस्ट रोजी दोन्ही शहरांत अनेक ठिकाणी त्यांना स्फोट घडवायचे होते. पुण्यातून इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी आणि त्यांना मदत करणाऱ्या अन् मास्टरमाइंड असलेल्या झुल्फीकार अली बडोदावाला, अब्दुल पठाण आणि रत्नागिरीमधील पेंडारी येथील सीमाब नसरुद्दीन काजी यांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इसिस अन् अल सुफाशी संबंधित दोन अतिरेक्यांनी टाईम बॉम्बच्या साह्याने घातपात घडवण्याचे कट आखला होता. पुणे आणि मुंबईतील सरकारी कार्यालय आणि गर्दीची ठिकाणे त्यांचे लक्ष होते. तसेच भारत आणि इस्त्राईलमधील अनेक संस्था त्यांच्या निशाण्यावर होती. महाराष्ट्रात 1992-93 सारखे स्फोट घडवण्याची त्यांची योजना होती. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी चोरीच्या मोटरसायकलवरुन पश्चिम महाराष्ट्रात 1000 किमी प्रवास केला होता. बॉम्ब बनवल्यानंतर ब्लास्टसाठी ते जंगलांचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी कोल्हापूरपासून ते सातारापर्यंत अनेक जागा निश्चित केल्या होत्या. सातारातील जंगलामध्ये त्यांनी बॉम्ब घडवण्याची ट्रॉयल केली होती.

बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण

दहशतवाद्यांनी एक प्रयोगशाळाही तयार केली होती. तसेच त्यांना मदत करणारे एटीएसच्या जाळ्यात आले आहेत. झुल्फीकार अली बडोदावाला हा त्यांना पैसे पुरवत होता. दोन दहशतवाद्यांच्या मदतीने इतर अनेक लोकांना बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम बडोदावाला करत होता. मेकेनिकल इंजीनिअर असलेला सीमाब नसरुद्दीन काजी हा त्यांना आर्थिक मदत करत होता. दोन्ही दहशतवाद्यांना पुण्यात घर देणे आणि त्यांना कामकाज देण्याचे काम अब्दुल पठाण याने केले होते. या सर्वांना एटीएसने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यातून धक्कादायक माहिती वास्तव समोर आली.

Leave A Reply

Your email address will not be published.