NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राहत्या घरातच बॉम्ब बनवण्याचा होता प्लॅन.. वाचा एटीएसचा मोठा खुलासा

0

  पुणे/एनजीएन नेटवर्क

पुण्यात मुसक्या आवळलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसने सर्वात मोठा खुलासा केला आहे. ज्या घरात हे दहशतवादी राहत होते, त्या घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन लिहिलेला कागद सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घराच्या पंख्याच्या पाईपमध्ये एक कागद लपवण्यात आला होता. ज्यात बॉम्ब बनवण्याची सर्व माहिती हाताने लिहिली होती. हा कागद एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

या प्रकरणात पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. अदनान अली सरकार असे या डॉक्टरचे नाव आहे. अदनान अली हा भूलतज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. पुण्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ज्या  घरामध्ये हे दहशतवादी राहत होते. तेथे तपासादरम्यान अनेक धक्कादायक पुरावे तपास पथकाच्या हाती लागले आहेत.  अॅल्युमिनीयमचे पाईप, काच आणि बुलेट्स देखील सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा पुणे किंवा अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन होता याची कसून चौकशी आता एटीएस करत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.