- नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
पिंपळनेर शहरात प्रथमच नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते दरम्यान आज झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पिंपळनेरात ७१.९८ टक्के मतदान झाले आहे. एकूण २३ मतदान केंद्रात एकूण ७१.९८ टक्के (अंदाजित) मतदान झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये १७७३ पैकी १३५६ (७६.४८ टक्के) इतके मतदान झाले. प्रभाग क्रमांक २ मध्ये १८५३ पैकी १२४४ ( ६७.१३ टक्के) इतके मतदान झाले. प्रभाग क्रमांक ३ मध्ये १७८२ पैकी १३५९ ( ७६.२६ टक्के) इतके मतदान झाले.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये २४३८ पैकी १६४४ (६७.४३ टक्के) इतके मतदान झाले.प्रभाग क्रमांक ५ मध्ये २१७१ पैकी १६६३ (७६.६० टक्के) इतके मतदान झाले.प्रभाग क्रमांक ६ मध्ये १८७९ पैकी १४५३ (७७.३२ टक्के) इतके मतदान झाले.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये १५३८ पैकी १०३४ (६७.२३ टक्के) इतके मतदान झाले.प्रभाग क्रमांक ८ मध्ये २३३० पैकी १७६५ (७५.७५ टक्के) इतके मतदान झाले.प्रभाग क्रमांक ९ मध्ये १९९० पैकी १४५८ (७३.२६ टक्के) इतके मतदान झाले.
प्रभाग क्रमांक १० मध्ये २५५२ पैकी १६४५ (६४.४५ टक्के) इतके मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.२ ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने काहीवेळ मतदान प्रकिया स्थगित झाली त्यानंतर पुन्हा सुरळीतपणे मतदान पार पडले.दरम्यान या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने १९ दिवस उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Comments are closed.