नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशात पेट्रोलच्या किंमती १०० रुपये लिटरच्या पुढे गेल्या आहेत. देशातल्या मुख्य शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४ ते १०७ रुपये प्रति लिटर आहे. अशात नितीन गडकरी यांनी देशात पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होऊ शकते असा दावा केला आहे. राजस्थानमधल्ये कार्यक्रमात जनतेला संबोधित करत असताना त्यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
गडकरी म्हणाले, ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो. शेतकरी हा आपल्या देशाचा फक्त अन्नदाताच नाही तर उर्जादाताही होईल. ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहनं लाँच करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर ही वाहनं चालतील. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होईल.”