मुंबई/एनजीएन नेटवर्क
ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केल्याचे अजित पवार गटाकडून वारंवार सांगितले जात आहे. शरद पवार यांनी मात्र वेगळे भाष्य करून दादा गटाची हवाच काढून घेतली आहे. पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचे कानावर आले आहे. सत्तेचा गैरवापर करून पावले टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील असे सांगतानाच कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.