नाशिक : एका ५० वर्षीय व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत इमरजेंसी विभागात दाखल झाला. रुग्णाला असामान्य डोकेदुखी व चक्कर येत होती. तत्पूर्वी रुग्ण शिर्डी येथे एका रुग्णालयात डेंगू या आजारावर उपचार घेत होता. परंतु जेव्हा रुग्णाच्या रक्तातील पेशी असामान्य पणे कमी होण्यास सुरवात झाली तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे पुढील उपचार घेण्याचे ठरवले.
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉ सुशील अंतुर्लीकर यांनी रुग्णाची तपासणी केली. रुग्णाची लक्षणे डेंगू आजारापेक्षा वेगळी असल्याचे निर्दर्शनात आले. डॉक्टरांनी तातडीने काही तपासण्या करण्यास सांगितल्या आणि मेंदूविकार तज्ञ डॉ तेजस साकळे यांनाही या रुग्णाच्या लक्षणाबद्दल सांगितले, डॉक्टरांनी रुग्णाचा एम आर आय करायचा सांगितला. सर्व तपासण्या केल्यानंतर असं निर्दर्शनात आले कि, रुग्णाला “म्युकर मायकोसिस” या बुरशी जन्य आजाराची लागण झाली आहे. म्हणून रुग्णाला पुढील उपचारासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे कान नाक घसा शस्रक्रिया तज्ञ डॉ पंकज भट आणि श्वसन विकार तज्ञ डॉ स्वप्निल काकड यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. डॉ पंकज भट यांनी रुग्णाची इंडोस्कोपी करून रुग्णाच्या पुढील उपचाराला सुरवात करण्यात आली.
म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार (Mucormycosis is a Fungal Disease) आहे. म्युकर मायकोसिस हा विषाणू साधारणपणे नाक किंवा सायन्सच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. हा रोग नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करीत असतो. काळी बुरशी, पांढरी बुरशी, आरेंज बुरशी असे बुरशीचे प्रकार आहेत. म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना किंवा मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून आले आहे. वेळीच उपचार घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.
म्युकर मायकोसिस या आजारात उपचार फार मर्यादित असतात. या उपचारात ‘एम्फोटेरेसीन बी’ इंजेक्शन सुरु करावं लागत. ते रुग्णाला पुढील २१ दिवस देण्यात आल. या २१ दिवसात डॉ पंकज भट यांनी डोळ्यापर्यंत पसरलेली बुरशी नियमित साफ करून ती काढून टाकणे तसेच नाक व डोळ्याची नियमित साफसफाई केली. नाकातील बुरशी काढण्यासाठी ‘सायनस इंडोस्कोपी’ म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर फुफ्फुसात देखील बुरशीची बाधा झाली आहे असे निर्दशनास आल्यानंतर पल्मोनोलॉजिस्ट ( श्वसन विकार तज्ञ ) डॉ स्वप्निल काकड यांनी ब्रॉन्कोस्कोपी ( दुर्बिणी द्वारे ) फुफ्फुसांमध्ये ब्रॉन्कोस्कोपीक लवाज देऊन उपचार करण्यात आले. यामुळे रुग्णाला फुफ्फुसांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग कमी होण्यास मदत झाली.
डोळ्याची नजर वाचवण्यासाठी डॉ महेंद्र गांगुर्डे यांनी बरेच प्रयत्न केले परंतु त्यात यश आलं नाही. शेवटी या गंभीर आजारातून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी व या जीवघेण्या आजारातून रुग्णाला मुक्त करण्यासाठी नातेवाईकांशी चर्चाकरून बाधित झालेल्या डोळ्यावरील बुरशी मेंदू पर्यंत न जाण्यासाठी आणि निकामी डोळा काढण्यासाठी शस्रक्रिया करून तो काढण्यात आला. म्युकर माकोसिस या बुरशीला शस्रक्रिया करून प्रतिबंध घालण्यात आला आणि रुग्णाला या मुळे नवजीवन मिळाले.
ReplyForwardAdd reaction |